बारव पुनर्जीवन तसेच स्थापत्याचे जतन संवर्धनासाठी बारव संवर्धन समिती गठन करणे बाबत.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक 18 मे 2023 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे
प्राचीन काळापासून जलसंवर्धन हा राज्याचा एक मुख्य विषय राहिलेला आहे आपण पाहतोच की वेगवेगळ्या जुन्या पर्यटन मार्गांवरती विहिरी, तलाव अशा विविध जलस्त्रोतांची निर्मिती तत्कालीन दानशूर व्यक्तींनी केलेली दिसते. तसेच शेत सार्याच्या मोबदल्यात राजे अशा प्रकारच्या सुविधा जनतेसाठी उपलब्ध करीत. त्यातीलच एक म्हणजे बारव म्हणजेच स्टेपवेल किंवा पायऱ्या असलेली विहीर.
पाण्याच्या साठा करण्यासाठीच्या या स्टेपवेल्स महाराष्ट्रात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. सिव्हिल अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना म्हणून या स्टेपवेल मानल्या जातात. गुजरात मधील राणी कि बाव किंवा दिल्लीमधील ऊग्रसेन की बावडी किंवा कुडाळ येथे असलेली घोडेबाव ही काही उदाहरणे आहेत. महाराष्ट्र राज्यात यादवकालीन शिवकालीन पेशवेकालीन होळकर अशा वेगवेगळ्या राजवटींमध्ये बारवा बांधल्या आहेत मराठा राजवटीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक बाराव बांधले गेले त्यातील काही शिवपिंडीच्या आकारातील सुद्धा आहेत अहिल्याबाई होळकर यांनी उत्तर महाराष्ट्रात बारवा बांधण्याची नोंद आहेत कोकणात चिऱ्याच्या दगडात बांधण्यात आलेल्या बारवा या घोडेबाव म्हणून ओळखले जातात.
अनेक बारवांमध्ये अजूनही वर्षाचे बाराही महिने पाणी असते परंतु या बारवांकडे आता बरेच दुर्लक्ष झाले आहे. बऱ्याचशा बारवांमध्ये कचरा फेकला जातो निर्माल्य,प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या या फेकल्या जातात पण अनेक गावातील तरुणांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचे प्रयत्नात आहेत.
उपरोक्त शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य बारवांची निर्मिती सातवाहन काळापासून सुरू झाली आहे सध्या सुमारे वीस हजार ऐतिहासिक बारावा नोंदणीकृत आहेत. परंतु या बारवा सद्यस्थितीत ढासळलेल्या बुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते त्याचबरोबर पाण्याचा स्त्रोत म्हणून त्यांचा वापर होत नसल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे. त्यासाठी या बारवांचे पुनरुज्जीवन तसेच स्थापत्याचे जतन संवर्धनासाठी बाराव संवर्धन समिती गठित करण्यात येत आहे.
प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी, दर्शनीका म्हणजेच गॅझेटिअर विभाग त्याचबरोबर भूजल सर्वेक्षण विभाग, याव्यतिरिक्त या बारव संवर्धन विषयात कार्यरत असणारे विविध कार्यकर्ते, वास्तु विशारद व अन्य तज्ञ मिळवून बावीस सदस्यांची ही समिती तयार करण्यात आली आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय याचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
या समितीला खालील प्रमाणे कार्य करता येईल
⁃ महाराष्ट्र राज्यातील बारवांचे जतन व संवर्धन तसेच पुनर्जीवन करण्यासाठीची योजना तयार करणे
⁃ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील निवडक 75 बारवा संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे
⁃ महाराष्ट्रातील बारवांचे गॅझेटिअर तयार करण्यासाठी संबंधित विभागाला सहकार्य करणे
ता. क.
विविध सोशल मीडिया पोस्ट वरून असे लक्षात येते की सदर समिती मधील काही सदस्यांचा काही बाबतीत आक्षेप असल्याने त्यांनी सिविल सोसायटी मार्फतच एक अशासकीय समिती स्थापन करून बाराव संवर्धनाचे काम शासनाच्या मदती व्यतिरिक्तही सुरू केले आहे.
या दोन्ही शासकीय व अशासकीय समित्यांमध्ये आगामी काळात समन्वय साधला जाईल व बारवांसारख्या प्राचीन जलस्त्रोतांचे संवर्धन अधिक दर्जेदार होईल अशी अपेक्षा आपण करूया.
Comments
Post a Comment