प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायत स्तरावर अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्याबाबत सदरचा शासन निर्णय हा नियोजन विभागाने दिनांक 29 मे 2023 रोजी निर्गमित केला आहे. राज्यात वाढती बेरोजगारी ही ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेला वाढती मागणी यासोबत जोडलेली असते. तशीच काहीशी परिस्थिती आता देशभरात - महाराष्ट्र राज्यातही दिसून येत आहे. या व्यतिरिक्त रोजगार हमी योजना ही एक इतर योजनांची वाहक (वेहीकल) योजना राबविण्यात येत असल्यामुळे रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभांच्या कामांची मागणी वाढलेली आहे. बऱ्याचश्या ग्रामपंचायती या समूह ग्रामपंचायत असतात त्यामध्ये वाडी , वस्ती, तांडे हे विखुरलेल्या स्वरूपात असतात त्यामुळे ग्रामपंचायती अंतर्गत मजुरांना मागणीनुसार विहित कालावधीमध्ये काम उपलब्ध करून देणे व कामाचे नियोजन करणे व योजनेची अंमलबजावणी करणे यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता शासनाला वाटू लागली आहे. रोजगार हमी योजनेमध्ये काम करत असताना मजुरीच्या अनुषंगाने मजुरांची हजेरी ही मोबाईल ॲप वरती नोंदवायची आहे. आणि या अनुषंगाने मजुरीचे वितरण व उत्पादक स्थायी मत्ता निर्माण करणे हे आवश्...