गाव तिथे गोदाम दिनांक 13 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने गाव तिथे गोदाम ह्या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि कृषी विषयक साधनसामुग्री साठवण्यास मदत करण्यासाठी विशेषता ग्रामीण भागात अशा सर्व संबंधित सुविधांसह साठवून शर्वता निर्माण करणे. कृषी प्रक्रियांची बाजारपेठ सुधारण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे वित्त पुरवठा व विपणन कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतमालाचा होणारा अपव्य व बिघाड रोखणं. गोदामांमध्ये साठवून ठेवता येईल अशा शेतमालाच्या संदर्भात छोट्या शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे भारतातील कृषी गोदामांच्या बांधकामात खाजगी व सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनरुजीवन करणे. यासाठी विविध गावांमध्ये गाव तिथे गोदाम ही योजना राबवणे शासनाला आवश्यक वाटत आहे. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यांच्या ग्रामीण भंडारण योजना यामध्ये नमूद उद्देश निकष मार्गदर्शक तत्वे अनुदान यांचा प्राथमिक स्तरावर विचार विनिमय करणे ...