Skip to main content

Posts

Showing posts with the label Ground water

केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना राज्यात राबवण्याबाबत

  केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना राज्यात राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हे शासन शुद्धिपत्रक दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी निर्गमित केले आहे. भूजल हा अत्यंत महत्त्वाचा पर्यावरणीय विषय आहे. महाराष्ट्र राज्य हे राजस्थान नंतर सर्वात वेगवान होणाऱ्या वाळवंटीकरणासाठी आता ओळखलं जात आहे. कमी पावसाच्या प्रदेशात जास्त पाणी आवश्यकता असणारी पिके घेणे यामुळे जमिनी अंतर्गत असलेले पाणी म्हणजेच भूजल अत्यंत कमी होत आहे व खोल जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व भूजलाची गुणवत्ता व उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने अटल भूजल योजना राज्यात राबवण्याचे ठरविले आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील १३ जिल्हे त्यातील ४३ तालुके व या तालुक्यांमध्ये ७३ पाणलोट क्षेत्र व ११३३ ग्रामपंचायत मध्ये १४४२ गावांमध्ये ही योजना राबवण्याचे निश्चित केले आहे.  या योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत 1. मागणी म्हणजेच पाणी बचतीच्या उपाययोजना व पुरवठा म्हणजेच जलसंधारण व भूजल पुनर्भरण व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करून भोजन सा...