वनतळी बांधणे 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता वनविभागाच्या अंतर्गत वनतळी बांधण्याकरता चा शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 21% इतकेच भौगोलिक क्षेत्र हे वनक्षेत्र असून राष्ट्रीय वन धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या वनक्षेत्र हे किमान 33% असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात कमी घनता असलेल्या वन क्षेत्रामध्ये घनता वाढवण्याच्या दृष्टीने परिणामकारक पाऊल जलद गतीने उचलण्याची आवश्यकता आहे राज्यांमध्ये ज्या वनक्षेत्रात पावसामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते त्या वनक्षेत्रामध्ये जमिनीची धूप रोखण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाची गती रोखणे आवश्यक आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी मध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने व सदर क्षेत्रामध्ये वृक्ष घनता वाढवण्यासाठी वन विभागामार्फत वनतळी बांधणे हा कार्यक्रम हाती घेतला जातो. शासन निर्णयाच्या अंतर्गत नाशिक वनवृत्त साठी 149.97 लाख, नागपूर वनवृत्त साठी 97.28 लाख चंद्रपूर वनवृत्त साठी 130.93 लाख, पुणे वनवृत्तासाठी 122.69 लाख औरंगाबाद विभागासाठी 127 पूर्णांक 29 धुळ्यासाठी 131.99 कोल्हापूर साठी 99.24...