महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना आता कृषी व पंचायत विभागामार्फत राबविण्याबाबत
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना आता कृषी व पंचायत विभागामार्फत राबविण्याबाबत
आत्तापर्यंत राज्यात साधारणता पंधरा हजार एकर तुती लागवड करण्यात आली असून विविध ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे. निधी उपलब्ध असूनही ही योजना राज्यात पाहिजे त्या प्रमाणात राबविण्यात येत नसल्याने आता रेशीम उद्योग विकास योजना रेशीम संचालनालयासह कृषी विभाग व पंचायत विभागामार्फत राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
तुती लागवडीसाठी कमीत कमी एक एकर व जास्तीत जास्त पाच एकर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. तसेच लागवडी क्षेत्र कितीही असले तरी प्रत्येक लाभार्थ्याला 50 फूट लांबीचे व 22 फूट रुंदीचे कीटक संगोपन गृह अनुज्ञेय राहील.
लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक ठिकाणी अर्ज पेटी ठेवण्यात येईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल अर्ज करताना शेतकऱ्यांनी त्यांना कोणत्या यंत्रणे कडून म्हणजेच ग्रामपंचायत किंवा कृषी विभाग या दोन पैकी कोणाकडून योजना राबवण्यात रस आहे ते स्पष्टपणे नमूद करावे. असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यासाठी मान्यता घेण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची राहील व येणाऱ्या ग्रामसभेमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या यादीत ग्रामसभेत अवलोकनार्थ ठेवण्यात यावे.
रोजगार हमी योजनेच्या प्रक्रियेनुसार लेबर बजेट किंवा पूरक लेबर बजेटमध्ये अशा सर्व अर्जांना मान्यता देण्यात येऊन जिल्हास्तरीय समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल. आगामी पाच वर्षासाठी एक लाख एकर किंवा चाळीस हजार हेक्टर चे लक्षात या योजनेमध्ये ठरवण्यात आला आहे.
या योजनेच्या प्रशिक्षणासाठी विविध जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र कृषी चिकित्सालय कृषी विद्यापीठे तसेच कृषी विभागाशी संबंधित प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.
वरच्या शासन निर्णयासोबतच परिशिष्ट एक मध्ये योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठीच्या अर्जाचा नमुना जोडण्यात आला आहे. तसेच परिशिष्ट दोन मध्ये संमती पत्राचा नमुना जोडण्यात आला आहे.
सुधारित अंदाजपत्रकानुसार रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत (५०x२२) रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम साठी एकूण अकुशल मजुरी 58,149 रुपये तर कुशल मजुरी ही 1 लाख 21 हजार रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
मागील वर्षी कोशाचे दर रुपये 250 रुपये प्रति किलो ते ९००/- रुपये प्रति किलो इतके होते यावरून लक्षात येईल की कोशदरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ-उतार होत असते रेशीम उद्योगात सहभागी होणारे शेतकऱ्यांनी बाजारातील अशा धोक्यांचा सखोल अभ्यास करूनच या क्षेत्रात शिरावे. कीटक संगोपनाचे तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे.
याचसोबत तुतीचा पाला हा दुधाळ जनावरा करिता सुद्धा उपयुक्त आहे तुतीच्या पाण्यामध्ये प्रथिने जवळपास 25% पर्यंत असतात त्यामुळे दुधा जनावरांना गवतासोबत किंवा इतर चाऱ्यासोबत तुतीचा पाला दिल्यास त्यांना हा पुरेसा होऊ शकतो. तुतीची लागवड चारा पीक म्हणून केल्यास पहिली कटिंग मिळायला जवळपास तीन महिने लागतात नंतर प्रत्येक 45 ते 60 दिवसांमध्ये चांगला तुतीचा पाला चाऱ्याकर्ता उपलब्ध होऊ शकतो.
यामुळेच शेतकऱ्यांनी तुती लागवडीच्या उद्योगाकडे दुधाळ जनावरांसाठी चारा तसेच रेशीम कीटकांसाठी खाद्य या दोन्ही उपयुक्ततेमुळे एकत्रितपणे पाहण्याची आवश्यकता आहे.
Thank You
Comments
Post a Comment