राज्यातील काजू फळ पिकाच्या विकासाकरता महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन करणे
महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत दिनांक 16 मे २०२३ रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोकण विभागातील आंब्यानंतर काजू हे सर्वात महत्त्वाचे नगदी पीक आहे अतिशय दुर्गम व कमी पाणी असलेल्या शेतजमिनीत सुद्धा काजू उगवतो आणि याचमुळे शेतकऱ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे फळ पीक आहे.
या काजू फळ पिकाच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन 2018 सालात काजू फळ पिक विकास समिती गठित करण्यात आली होती. या समितीने ज्या शिफारशी केल्या त्याच्या अनुषंगाने 2022 सालात काजू फळ पीक विकास योजना लागू करण्यात आली होती.
आता ही योजना कार्यान्वित करण्यासाठी रुपये 50 कोटी इतके भाग भांडवल शासनाने देण्याचे आदेश दिले आहेत. आणि या निधीचा वापर करून काजू उत्पादनात वाढ व्हावी याकरता काजू पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे असे विचाराधीन होते. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे. या मंडळाचे कार्यक्षेत्र हे राज्यातील संपूर्ण कोकण विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व चंदगड हे तालुके राहतील.
हे मंडळ कंपनी कायद्याच्या अंतर्गत ना नफा तत्वावरील सेक्शन ८ च्या अंतर्गत नोंदणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे अध्यक्ष हे पणन मंत्री असतील. विविध शासकीय विभागातील जसे की सहकार व पणन विभाग, वित्त विभाग, नियोजन विभाग , कृषी विभाग , महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ , अपेडा या विभागातील प्रतिनिधी हे संचालक म्हणून कार्यरत राहतील.
या व्यतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून १ काजू प्रक्रिया उद्योजक, १ काजू उत्पादक शेतकरी, १ सहकारी काजू प्रक्रिया प्रकल्पांचा महासंघ यांचा प्रतिनिधी आणि १ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील काजूप्रक्रिया तज्ञ असे ( ४ )स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहतील.
या मंडळाचे कार्य पुढीलप्रमाणे राहील.
1. राज्याचा एक स्वतंत्र काजू ब्रँड तयार करून त्याची प्रसिद्धी करणे, काजू फळ पिकाला जे जीआय मानांकन मिळालेले आहे त्याचा विस्तार करणे, काजू पिकासाठी प्रशिक्षण वर्ग प्रात्यक्षिक इत्यादींचा आयोजन करणे
2. काजू प्रक्रिया उद्योग उभारण्यास चालना देणे, काजूवर प्रक्रिया करणारे प्रकल्प वर्षभर चालू राहण्यासाठी काजू बी खरेदी करून ती उपलब्ध करून देणे, प्रक्रिया उद्योगासाठी ज्या सुविधा लागतील त्यांची उभारणी करणे.
3. काजू पिकाच्या विक्रीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे , देशांतर्गत व्यापाराला चालना देणे काजूची निर्यात कशी करायची याबाबत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन करणे,
4. काजूचे उत्पादक विक्रेते प्रक्रियादार ग्राहक निर्यातदार यांची नोंदणी करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करणे व नोंदणी करणे
5. राज्याचा काजूचा व्यवसाय विकास आराखडा तयार करणे, रिटेल क्षेत्रातील कंपन्यांना सुविधा तसेच काजूचा पुरवठा करणे, प्रकल्प अहवाल तयार करून उभारणी साठी मार्गदर्शन करणे. काजू पिकासाठी उत्पादकांना तारण कर्ज उपलब्ध करून देणे.
या काजू मंडळाचे मुख्य कार्यालय विकिरण सुविधा पणन मंडळ वाशी नवी मुंबई येथे असेल तर विभागीय कार्यालय एक रत्नागिरी मध्ये तर दुसरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल.
या माध्यमातून आता काजू शेतकऱ्यां पुढील प्रश्न व काजू कारखाने यांच्यापुढील प्रश्न तातडीने सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा करूया.
धन्यवाद

Comments
Post a Comment