मागेल त्याला फळबाग, ठिबक सिंचन, शेततळे, शेडनेट इत्यादी देण्याबाबत
याबाबतचे शासन परिपत्रक कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाद्वारे दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
2023 24 चा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जून 2015 मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून आता मागेल त्याला फळबाग, ठिबक व तुषार सिंचन शेततळे शेततळ्याचे अस्तरीकरण शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्र व कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले आहे.
या सर्व घटकांसाठी यापूर्वीच योजना उपस्थित आहेत त्या योजनांच्या अंतर्गत वरील प्रमाणे मागील त्याला घटक देण्यात येणार आहेत त्या योजना पुढील प्रमाणे.:-
1. मागील त्याला फळबाग ही योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याच्या अंतर्गत दिली जाईल
2. मागील त्याला ठिबक व तुषार सिंचन हे योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) या अंतर्गत दिले जाईल
3. मागेल त्याला शेततळे हे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत दिले जाईल
4. मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना,एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान , मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना , बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यांच्या अंतर्गत दिले जाईल
5. मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्रे आणि कॉटन श्रेडर हे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यांच्या अंतर्गत दिले जाईल
सर्व योजनांचा लाभ घेण्याकरता त्या त्या योजनांचे विहित निकष व योजनांच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येईल.
याकरिता पात्र व ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधल्यास त्यांना याबाबत अजून जास्त माहिती मिळू शकेल व अर्ज करता येतील.
Thank You
Comments
Post a Comment