प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्याबाबत
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्याबाबत हा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी निर्गमित केला आहे रस्ते त्यात ही ग्रामीण रस्ते हा सर्वात जास्त जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांमध्ये अजूनही जोड रस्ते किंवा तांबरी रस्ते अस्तित्वात नाहीत आणि या विषयावर काम करण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या दोन महत्त्वाच्या योजना आहेत. या योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते. या योजनांची कामे जलद गतीने आणि ठरवलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय मान्यता ते कार्यारंभ आदेश यादरम्यान होणारा कालापव्यय टाळण्यासाठी तसेच अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी विविध स्तरांवरती समित्या घटित करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये अधिकारांचा सुद्धा विकेंद्रीकरण करण्यात आलेला आहे. राज्यस्तरावर तिची निविदा समिती तयार करण्यात आली आहे त्यामध्ये चार सदस्य आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते ...