वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे कापड निर्मितीमध्ये जगात भारत दुसरा क्रमांकावर असून घरगुती व तांत्रिक उत्पादनांचा समावेश असलेल्या कापडाचा पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. देश अंतर्गत उत्पादनामध्ये वस्त्रोद्योगाचा वाटा 2.3% इतका आहे तर उद्योग औद्योगिक उत्पादनात 13 टक्के आणि एकूण निर्यातीमध्ये 12 टक्के निर्यात ही कापडाची असते. अंदाजे (४.५) साडेचार कोटी लोक या क्षेत्रात थेट रोजगारात गुंतलेले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि ग्रामीण लोकसंख्येचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागातर्फे या उद्योगाच्या विकासासाठी संपूर्ण देशभरात खालील प्रमाणे योजना सध्या राबवल्या जात आहेत. ◦ प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम ◦ सुधारित तंत्रज्ञान अद्ययावतीकरण योजना ◦ यंत्रमाग क्षेत्राच्या विकासासाठी योजना ◦ एकात्मिक वस्त्रोद्योग संकुल योजना ◦ समर्थ वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढीसाठी योजना ◦ समग्र रेशीम विकास योजना ◦ राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम तसेच राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रम ◦ प्राथमिक लोकर विकास कार्यक्रम ◦ जूट चे उत्पादन वा...